भुसावळात महाराणा प्रताप यांना अभिवादन
भुसावळ : शहरातील महाराणा प्रताप चौकात राजपूत समाज बांधवांनी महाराणा प्रताप यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले. हिंदूसूर्य, वीर शिरोमणी, मेवाड अधिपती, परम प्रतापी महाराणा प्रताप यांची मंगळवारी पुण्यतिथीनिमित्त समाजबांधवांनी त्यांना अभिवादन केले. कंडारीचे नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य नितीन पाटील यांनी पूजन केले. त्यानंतर पुष्पगुच्छ वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी ललित मराठे, दामोदर राजपूत, रणजीत राजपूत, अभिजीत पाटील, चंदू चौव्हान, नितीन पाटील, विक्की राजपूत, सोनी ठाकूर, किरण राजपूत, पोमेश राणे, श्याम गोविंदा, भूषण पाटील, पवन चौधरी यांच्यासह राजपूत समाजबांधव उपस्थित होते.


