कुविख्यात काल्याने पोलिसांशी हुज्जत घालत स्वतःला मारली कात्री : सहा आरोपी अटकेत
भुसावळातील हॉटेलमध्ये चाकूच्या धाकावर लूट प्रकरणात मोठी कारवाई
भुसावळ : पोलिस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा मागे घ्यावा यासाठी चाकूच्या धाकावर धमकी देत टोळक्याने महामार्गावरील पंजाब खालसा हॉटेलमध्ये साहित्याची फेकाफेक करीत हॉटेल चालक सारंगधर महादेव पाटील (खडका रोड, भुसावळ) यांना चाकूच्या धाकावर जीवे ठार मारण्याची धमकी देत गल्ल्यातील सात हजारांची रोकड लांबवून पोबारा केल्याची घटना सोमवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली हेती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर कुविख्यात बाबा काल्यासह सहा संशयीतांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, अटकेसाठी गेलेल्या पोलिसांशी हुज्जत घालत स्वतःला अंगावर कात्रीने आरोपी बाबा काल्याने वार करून घेतल्याने या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला.
गोळीने ठार मारण्याची धमकी देत केली लूट
हॉटेल मालक सारंगधर पाटील यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी रात्री 10.30 वाजता हॉटेल बंद केल्यानंतर आरोपी आशिक बेग अस्लम बेग मिर्झा उर्फ बाबा काल्या, समीर (पूर्ण नाव नाही, रा.खडका रोड, भुसावळ), नईम (पूर्ण नाव नाही) व अन्य तीन अनोळखींनी बेकायदा हॉटेलमध्ये प्रवेश केला तर आरोपी बाबा काल्याने आपल्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा यासाठी चाकूचा धाक दाखवत गुन्हा मागे न घेतल्यास गोळीबार करून ठार मारेल, अशी धमकी दिली तसेच अन्य आरोपींनी हॉटेलमधील खुर्च्यांसह भांड्यांची फेकाफेक तोडफोड केली तसेच आरोपींनी काऊंटर फेकत त्यातून सात हजार रुपयांची रोकड लांबवली. हा वाद सुरू असताना हॉटेलमधील कामगार जितेंद्र भावसार, ऑल्वीन अँथोनी व कमलेश परदेशी यांनी वाद सोडवल्यानंतर आरोपी पसार झाले.

कुविख्यात बाबा काल्यासह सहा आरोपींना अटक
हॉटेलमधील लूट प्रकरणी शेख रीजवान उर्फ बबलू शेख अशपाक (20, रा.मुस्लिम कॉलनी भुसावळ), परवेज हमीद कुरेशी (24, रा.आगाखान वाडा, भुसावळ), सय्यद वसीम सय्यद (33, रा.पंचशील नगर, भुसावळ, शेख नईम शेख सलीम (33, रा.दीनदयाळ नगर, भुसावळ), समीरउद्दीन अमिनोउद्दीन (25, रा.शनी पेठ, जळगाव) यांना खडका चौफुलीवरून तर मुख्य आरोपी आसीफ उर्फ बाबा काल्या असलम बेग (25, रा.अयान कॉलनी, भुसावळ) यास मंगळवारी सायंकाळी भुसावळ शहरतील मुस्लिम कॉलनी भागातून अटक करण्यात आली. पोलिस आल्यानंतर आरोपीने पोलिसांशी हुज्जत घालत स्वतःला कात्री मारून घेतल्याने त्याच्याविरुद्ध शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक कृष्णा भोये, गणेश धुमाळ, अनिल मोरे, मंगेश गोंटला, हवालदार नेव्हील बाटली, किशोर महाजन,
रवींद्र बिर्हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, योगेश माळी, ईश्वर भालेराव, दिनेश कापडणे, होमगार्ड धुळीचंद तायडे, अझ्झाजउद्दीन अमिनोउद्दीन आदींनी केली.


