फैजपूरात विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड
फैजपूर : नगरपरीषदेच्या विषय समितीच्या सभापतींची बुधवारी दुपारी 12 वाजता पालिका सभागृहात ऑनलाईन विशेष बैठक झाली. पीठासीन अधिकारी जामनेर येथील तहसीलदार अरुण देवबा शेवाळे होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष महानंदा होले, मुख्याधिकारी किशोर चव्हाण होते.
विषय समिती सभापतींची निवड
अध्यक्ष महानंदा टेकाम-होले, पाणीपुरवठा व जलसंधारण सभापती उपाध्यक्ष नयना- चंद्रशेखर चौधरी, स्वछता विषय, वैद्यकीय व आरोग्य सभापती- कलिमखान हैदरखान मणियार, सार्वजनिक बांधकाम सभापती मिलिंद शंकर वाघुळदे, महिला व बालकल्याण समिती सभापती अमिता हेमराज चौधरी, नियोजन व विकास समिती सभापती- रशीद नसीर तडवी यांची निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी सभेचे कामकाज कार्यालयीन निरीक्षक संतोष वाणी, संगीता बाक्षे, सुधीर चौधरी, संगणक अभियंता प्रसन्न डोलरे, रवींद्र मेढे व हमीद तडवी यांनी बघितले.



