रावेर पालिकेत विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड
रावेर : नगरपालिका विषय समिती सभापतींची बुधवारच्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी उपाध्यक्ष शेख नुसरत यास्मिन कलीम यांची पदसिद्ध सभापती म्हणून, बांधकाम समितीच्या सभापतीपदी संगीता अग्रवाल, स्वछता आरोग्य समितीच्या सभापतीपदी अॅड.सुरज चौधरी, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीवर आसीफ मोहम्मद दारा मोहम्मद व महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी ललिता बर्वे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पीठासन अधिकारी म्हणून तहसीलदार उषाराणी देवगुणे होत्या. नगराध्यक्ष दारा मोहम्मद जफर मोहम्मद, मुख्याधिकारी रवींद्र लांडे उपस्थित होते. व्हिडिओ कॉन्फरन्स झालेल्या या सभेला 20 सदस्य उपस्थित होते.
विषय समित्यांचे सभापती व सदस्य असे- नियोजन विकास समिती- शेख नुसरत यास्मीन कलीम (सभापती), सदस्य- हमीदाबी अय्यूबखां पठाण, पार्वताबाई गणपत शिंदे, राजेंद्र रामदास महाजन, जगदीश नथ्थू घेटे, सार्वजनिक बांधकाम समिती- संगीता सूर्यकांत अग्रवाल (सभापती), सदस्य- सुधीर गोपाल पाटील, शेख सादीक अब्दुल नबी, खाँ असदुल्लाखां महेबूगबखाँ, संगीता भास्कर महाजन, स्वच्छता आरोग्य व दवाखाना समिती- अॅड.सुरज प्रकाश चौधरी (सभापती), सदस्य- रंजना योगेश गजरे, प्रकाश श्रीराम अग्रवाल, राजेंद्र रामदास महाजन, यशवंत वासुदेव दलाल, पाणीपुरवठा व जलनिःसारण समिती- आसीफ मोहंमद दारामोहंमद (सभापती), सदस्य- खाँ असदुल्लाखाँ महेबूबखां, संगीता शिरीष वाणी, सुधीर गोपाल पाटील, प्रल्हाद रामदास महाजन, महिला बालकल्याण समिती- ललिता मल्हारी बर्वे (सभापती), सदस्य- रंजना योगेश गजरे, संगीता शिरीष वाणी, शारदाबाई देविदास चौधरी, पार्वताबाई गणपत शिंदे



