सावदा पालिकेत विषय समित्या सभापती निवड बिनविरोध


सावदा : नगरपालिकेत विषय समिती सभापतींची बुधवारच्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी श्वेता संचेती होत्या. शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती- रंजना जितेंद्र भारंबे, स्वच्छता वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती- जयश्री अतुल नेहेते, नियोजन व विकास समिती- लीना संजय चौधरी, महिला व बालकल्याण समिती- करुणा राहुल पाटील. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्षा अनिता पंकज येवले, उपाध्यक्षपदी विश्वास तुकाराम चौधरी तर सदस्यपदी रंजना जितेंद्र भारंबे, जयश्री अतुल नेहेते, लीना संजय चौधरी, करुणा राहुल पाटील यांची निवड करण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !