नांदगावमध्ये बिअर शॉपी फोडली : दिड लाखांची बिअर लांबवली
बोदवड : तालुक्यातील नांदगाव येथे दिनांक 17 रोजी रात्री 10 वाजेपासून ते 18 जानेवारीच्या सकाळी 10 वाजेच्या सुमारास यश बिअर शॉपीच्या पूर्व बाजूकडील दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 57 हजार 290 रुपये किंमतीच्या बिअर लांबवल्या. कॅनॉन बिअरचे 11 बॉक्स, टुबर्ग बिअरचे पाच बॉक्स बडवाईझर बिअरचे चार बॉक्स, माईल्ड बिअरचे चार बॉक्स, हायओर्ड बिअरचे सहा बॉक्स तसेच 61 हजार 600 रुपये किंमतीची कोल्ड्रींक्स तसेच 15 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप आदी माल लांबवण्यात आला. शेजारल किराणा दुकानदार नरेंद्र शिवदास पाटील यांनी दुकान मालकास चोरीची माहिती कळवली. गजेंद्र संतोषसिंग पाटील यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार वसंत निकम करीत आहेत.


