लसीकरणाच्या तिसर्‍या दिवशी जिल्ह्यातील 521 आरोग्य सेवकांचे लसीकरण


जळगाव : कोरोना लसीकरणाच्या तिसर्‍या दिवशी जळगाव जिल्ह्यात आरोग्य विभागातील 521 आरोग्य सेवकांनी कोरोनाची लस घेतल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात शनिवारी कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर बुधवारी तिसर्‍या सत्रात जिल्ह्यात सात लसीकरण केंद्रावर प्रत्येकी 100 याप्रमाणे जिल्ह्यातील 700 आरोग्य सेवकांना कोरोनाची लस देण्याचे नियोजन आरोग्य यंत्रणेने केले होते. त्यानुसार बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे 100, महापालिकेच्या डी. बी. जैन हॉस्पीटलमध्ये 100, उपजिल्हा रुग्णालय, चोपडा 84, जामनेर 68, तसेच ग्रामीण रुग्णालय, पारोळा 41, चाळीसगाव 74, आणि नगरपालिका भुसावळ येथील केंद्रावर 54 असे एकूण 521 म्हणजेच 74.4 टक्के आरोग्य सेवकांना कोरोनाची लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चव्हाण यांनी दिली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !