धक्कादायक ! : सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत पाच जणांचा मृत्यू


पुणे : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला बुधवारी दुपारी लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. बीसीजी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. आता आग विझवण्यात आली असून या आगीत पाच जणांचे मृतदेह आढळले आहेत. हे मृतदेह नोबेल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याचे राजेश टोपे म्हणाले. याचबरोबर, कोरोना लस निर्मिती जिथे होते, ती इमारत घटनास्थळापासून लांब आहे. त्यामुळे कोरोना लसीचे कोणतेही नुकसान नाही.

कोरोना लस सुरक्षीत
पुण्यातील मांजरी परीसरातील गोपाळपट्टा भागात असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला ही आग लागली मात्र सुदैवाने ज्या इमारतीमध्ये कोव्हिशील्ड लस निर्मितीचे काम सुरू तेथे आग
लागली नसल्याचे सांगण्यात येत आहे.


पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला आग 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !