जळगाव ज्युक्टोतर्फे विभागीय सचिव राजेंद्र अहिरे यांचा सत्कार
भुसावळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक विभागीय सचिवपदी राजेंद्र अहिरे यांची नियुक्ती झाल्यानंतर जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय संघटनेतर्फे सचिव प्रा.शैलेश राणे, उपाध्यक्ष प्रा.राजेश बडगुजर, प्रा.एस.एच.चौधरी यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला. याप्रसंगी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन
प्रसंगी कोरोनामुळे इयत्ता अकरावी व बारावीच्या वगळण्यात आलेला अभ्यासक्रमाबाबत चर्चा करण्यात आली तसेच वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन, दहावी आणि बारावी आवेदन पत्रासाठी ऑनलाइन प्रणालीतील त्रृटी दूर करणे संदर्भात माहिती, उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी जिल्हानिहाय संकलन केंद्र संदर्भात चर्चा तसेच एप्रिल व मे 2021 मध्ये होणार्या दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा संदर्भात चर्चा करण्यात आली. वरील सर्व मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन विभागीय सचिवांनी दिले. तसेच संघटनेच्या पदाधिका-यांनी विभागीय अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांची भेट घेऊन मंडळाच्या कामकाजासंदर्भात चर्चा केली. त्यांनी सुद्धा मदत करण्याचे आश्वासन दिले. वरील मुद्यांबाबत दूरध्वनीवरून ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.सुनील गरुड यांचे मार्गदर्शन लाभले.



