अवैध गौण खनिज वाहतूक : रावेरात पकडले डंपर


रावेर : गौण खनिज वाहतूक करणार्‍या डंपर चालकाला आगाऊपणा चांगलाच भोवला आहे. महसूल पथकाने अवैध गौण खनिज वाहतुकीच्या संशयावरुन मध्यप्रदेश पासिंग डंपर पकडले असून ते गेल्या पाच दिवसांपासून तहसील कार्यालयाच्या आवारात उभे आहे. भुसावळ तालुक्यातील एका ठेकेदाराचे डंपर रावेर तालुक्यातील पूरी-गोलवाडे परीसरात रस्त्याच्या कामासाठी आले असता डंपर मालकाला न सांगता मध्यप्रदेश पासिंगचे एम.पी.47 एच.0160 वरील डंपर चालकाने रावेर शहरात एका खाजगी बांधकाम करणार्‍या ठिकाणी मुरुम आणून टाकला मात्र त्यावेळी ते डंपर महसूल पथकाच्या नजरेतुन वाचले परंतु दुसरी ट्रिप मुरुमची खाली करण्याच्या उद्दीष्टाने रावेर आला असता संबंधीत मुरुमने भरलेले डंपर महसूल पथकाने पकडत कारवाईसाठी तहसील कार्यालयाच्या आवारात आणले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !