भुसावळात इसमाचा ट्रॅक्टरवरून पडल्याने मृत्यू


भुसावळ : ट्रॅक्टरवरून पडल्याने भुसावळातील 55 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील खडका चौफुलीजवळ गुरुवारी सायंकाळी घडली. उखर्डू सीताराम सोनवणे (55, रा.सतारा भाग, भुसावळ) असे मयताचे नाव आहे. शहरातील खडका चौफुलीजवळून जात असलेले ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.19 सी.8651) वर चालकाजवळ उखर्डू सीताराम सोनवणे हे बसले होते मात्र ट्रॅक्टरवरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच बाजारेपठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार माणिक सपकाळे, उमाकांत पाटील, बंटी कापडणे यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी ट्रॅक्टरवरील चालक दौलतसिंग धुर्वे (रा. गांधी नगर, भुसावळ) यांना ताब्यात घेतले. घटनास्थळी सहा.फौजदार माणिक सपकाळे यांनी पंचनामा केला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !