विशेष महामना सुपरफास्ट गाडीचा केवडिया स्टेशनपर्यंत विस्तार
भुसावळ : रेल्वे प्रशासनातर्फे नव्याने सुरू करण्यात आलेल्या केवडीया स्टेशनपर्यंत दोन विशेष महामना सुपरफास्ट गाडीचा विस्तार करण्यात आला आहे. या गाड्या बडोदा स्टेशनऐवजी केवडीया स्टेशनपर्यंत धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
रीवा केवडीया विशेष महामना सुपरफास्ट गाडी
डाऊन 09105 केवडिया-रीवा महामना विशेष सुपरफास्ट गाडी 22 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवारी केवडीया स्टेशनहुन 6.55 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी रीवा स्टेशनला 5.15 वाजता पोहोचणार आहे. अप 09106 रीवा-केवडीया महामना विशेष सुपरफास्ट एक्स्प्रेस 23 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत दर शनिवारी रीवा स्टेशनहुन 8.55 वाजता प्रस्थान केल्यानंतर दुसर्या दिवशी केवडीया स्टेशनला 5.40 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला खंडवा, भुसावळ, जळगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

वाराणसी केवडीया विशेष महामना सुपरफास्ट गाडी
डाऊन 09103 केवडिया-वाराणसी महामना विशेष सुपरफास्ट गाडी 19 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत दर मंगळवारी केवडीया स्टेशनहुन 6.55 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी वाराणसी स्टेशनला 11.10 वाजता पोहोचणार आहे. अप 09104 वाराणसी-केवडीया महामना विशेष सुपरफास्ट गाडी 21 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत दर गुरुवारी वाराणसी स्टेशनहुन 5.25 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी केवडीया स्टेशन येथे 9.15 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल तसेच
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-19 संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.


