विद्यार्थीहित जोपासण्यासाठी महाविद्यालयात पायाभूत सुविधा आवश्यक


प्रा.डॉ.के.बी.पाटील : बोदवड महाविद्यालयात सुनंदा नारायण चौधरी सभागृहाचे उद्घाटन

बोदवड : प्राचार्य, प्राध्यापक यांच्या सकारात्मक भूमिकेतून शैक्षणिक संस्थेचा विकास घडत असतो. विद्यार्थीहित जोपासण्यासाठी महाविद्यालयात पायाभूत सुविधा आवश्यक असतात. बोदवड महाविद्यालयातील सुसज्ज अशा सुनंदा चौधरी सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी मला आनंद वाटतो , असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.डॉ.के.बी.पाटील यांनी येथे केले. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सुविधायुक्त सुनंदा नारायण चौधरी सभागृहाचे उद्घाटन समारंभ नुकताच झाला. याप्रसंगी ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी माजी कुलगुरू प्रा.डॉ.के.बी.पाटील, जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन, जामनेर एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव नारायण चौधरी, अ‍ॅड.प्रकाशचंद सुराणा, संस्थेचे व्हा.चेअरमन अजय जैन, सचिव विकास कोटेचा, प्राचार्य डॉ.अरविंद चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे चेअरमन मिठूलाल अग्रवाल अध्यक्षस्थानी होते.


महाविद्यालयीन विकासासाठी सकारात्मक : चेअरमन
अध्यक्षीय भाषणात संस्थेचे चेअरमन मिठूलालजी अग्रवाल यांनी महाविद्यालयीन विकास साधण्यासाठी संस्था व आम्ही सर्व संचालक सकारात्मक असतो . प्रत्येक विद्यार्थ्यास आवश्यक सुविधा मिळायला हवी अशी आमची भूमिका असल्याचे सांगितले. अ‍ॅड.प्रकाशचंद सुराणा यांनी आपल्या मनोगतात सुनंदा नारायण चौधरी सभागृहाचे बनण्यापूर्वीचे विविध टप्पे सांगितले. सचिव विकास कोटेचा यांनी प्राचार्य अरविंद चौधरी यांचे आई-वडील म्हणजेच सुनंदा नारायण चौधरी आणि नारायण चौधरी यांनी संस्थेला केलेल्या विशेष सहकार्याबाबत आभार मानले. राजू मोपारी, हारून मिस्त्री, अर्विता असोसिएशनच्या इंटेरीअर डिझाईनर अनामिका चौधरी यांच्या हॉल बांधणीच्या योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार आणि गुणगौरव करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी संस्थेचे संचालक अशोक जोगड, श्रीराम बडगुजर, विजय कोटेचा, रवींद्र माटे, आनंद जैस्वाल, रमेश जैन, माणकचंद अग्रवाल, अनंतराव कुलकर्णी, मंजुलता सुराणा, मीरा अग्रवाल, सुजाता कोटेचा, कांताबाई जैन, अनिता चौधरी, प्राचार्य यांच्या परीवारातील सदस्य, नातेवाईक, मित्रमंडळी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य प्रा.अरविंद चौधरी तसेच आभार उपप्राचार्य डी.एस.पाटील यांनी मानले तसेच सूत्रसंचालन प्रा.डॉ.गीता पाटील व नरेंद्र जोशी यांनी केले. हा कार्यक्रम प्राचार्य प्रा.अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यशस्वितेसाठी सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !