रेल्वे लाईनीवर चाकू घेऊन फिरणार्यास चार महिने कैदेची शिक्षा
भुसावळ : रेल्वे लाईनवरील आऊटरला हातात चाकू घेऊन रेल्वे लाईनीवर फिरणार्या मोहंम्मद अहमद फुरखान अन्सारी (21, रा.कुलाबा, मुंबई) यास अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणी रेल्वे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर आरोपीला चार महिने कैद व एक हजार रूपये दंड दंड न भरल्यास 15 दिवस साधी कैद अशी शिक्षा रेल्वे न्यायालयाने बुधवारी सुनावली. 6 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन भुसावळ येथील मुंबईकडील बाजूच्या आऊटरला डाऊन मार्गावर आरोपीला चाकूसह अटक करण्यात आली. याप्रकरणी हवालदार अजीत तडवी यांनी तपास करून न्यायालात दोषारोप पत्र दाखल केले. त्र्यंबक वाघ व सरकारी वकील वाजीद शेख यांनी काम पाहीले. तपासी अंमलदार तडवी यांना जगदीश ठाकूर, धनराज लुले, महेंद्र पाटील यांनी सहकार्य केले.


