कंडारीत दोन गट भिडले : परस्परविरोधी गुन्हा


महिलेचा हात धरण्यावरून तुंबळ हाणामारी : दगडफेकीत तीन जण जखमी : 15 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा

भुसावळ : महिलेचा हात धरण्यावरून दोन गट समोरा-समोर भिडल्यानंतर झालेल्या तुंबळ हाणामारीनंतर दगडफेकीत तिघे जखमी झाल्याची घटना तालुक्यातील कंडारी गुरुवारी रात्री घडली. या घटनेने खळबळ उडाली असून दोन्ही गटाच्या परस्परविरोधी फिर्यादीनुसार 15 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही गटातील दोन महिलांसह आठ आरोपींना अटक केली.

दोन परीवारात तुंबळ हाणामारी
कंडारीत गुरूवारी रात्री 8.15 वाजता महिला शौचास जाऊन आल्यावर एका व्यक्तीने या महिलेचा हात धरल्यानंतर महिलेने घरी जाऊन
घरातील मंडळींना याची माहिती दिल्यानंतर हात धरणार्‍यास जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर संशयीत हेमंत तायडे, दीपक, प्रकाश, पवन, रमेश, हिरामण, हर्षल, अशोक तायडे, जनाबाई व कुसूम तायडे यांनी महिलेच्या घरातील लोकांना शिवीगाळ करीत मारहाण केली. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून वरील दहा आरोपींविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व सहकार्‍यांनी रात्रीच कंडारी गाठत शांतता प्रस्थापीत केली.


दुसर्‍या गटाचीही फिर्याद
दुसर्‍या गटातर्फे हेमंत प्रकाश चोपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राकेश साळुंखे, सागर तायडे, प्रकाश तायडे, प्रेमचंद तायडे, पवन कोळी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पवन याने हेमंत चोपडे यांच्या आईला शिविगाळ  केली असता याचा जाब विचारल्याचा राग आल्याने सर्वच संशयीतांनी फरशी आणि दगडाने मारहाण केली. दोन गट भिडल्यानंतर झालेल्या दगडफेकीत तिघे जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी एका गटातील पाच व दुसर्‍या गटातील तिघांनी अटक केली असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !