भुसावळात 7 मार्च रोजी ‘महिला रन’


तीन, पाच व दहा किमी अंतरासाठी स्पर्धा : मर्यादीत महिलांनाच प्रवेश

भुसावळ : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 7 मार्च रोजी भुसावळ स्पोर्टस अ‍ॅन्ड रनर्स असोशिएशनतर्फे महिलांसाठी रनचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मर्यादित महिलांनाच प्रवेश दिला जाणार आहे. तीन, पाच व दहा किमी अंतरासाठी रनचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शुक्रवारी आयोजित पत्रकार परीषदेत डॉ.नीलिमा नेहेते व डॉ.चारूलता पाटील यांनी दिली. सुशिलाबाई नामदेव फालक विद्यालयात शुक्रवारी दुपारी पत्रकार परीषदेचे आयोजन झाले.

यांची होती उपस्थिती
यावेळी भुसावळ स्पोर्टस अ‍ॅण्ड रनर्स असोशिएशनचे अध्यक्ष प्रवीण फालक, प्रवीण पाटील, डॉ. तुषार पाटील, डॉ.निलीमा नेहेते, डॉ. चारूलता पाटील, गणसिंग पाटील, रणजित खरारे, प्रवीण वारके आदी उपस्थित होते.


7 मार्च रोजी महिला रन
डॉ. नेहेते व डॉ. पाटील यांनी सांगितले की, 7 मार्चला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून रनला सुरूवात होईल. तीन, पाच व दहा किमी या तिन्ही प्रकारांमध्ये प्रत्येकी 200 अशाप्रकारे 600 महिलांना प्रवेश दिला जाणार आहे. 26 जानेवारीपासून ऑनलाइन नावनोंदणी केली जाणार आहे. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र, मेडल आणि टी-शर्ट दिले जाणार आहे.

रस्त्यांवरील खड्डे कायम राहिल्यास मार्ग बदलणार
7 मार्चपर्यंत रस्त्यांवरील खड्डे बुजवले न गेल्यास रनचा मार्ग बदलला जाईल. पर्यायी मार्ग डॉ.आंबेडकर मैदान ते आयुध निर्माणीपर्यंत असेल. अन्यथा डॉ.आंबेडकर मैदान ते नाहाटा कॉलेज हा मार्ग असेल, 10 किमीसाठी महिला रर्नस रवाना झाल्यानंतर अर्ध्या तासाने पाच किमी व नंतर तीन किमी अंतराच्या स्पर्धकांना सोडले जाईल. स्पर्धेसाठी भुसावळ स्पोर्टस अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे अआवाहन केले आहे.

14 रोजी सायकलिंग स्पर्धा
असोसिएशनतर्फे आगामी 14 फेब्रुवारीला सायकलिंग सातपुडा चॅलेंजचे आयोजन केले आहे. यात भुसावळ ते पाल 100 किमी आणि भुसावळ ते खिरोदा 50 किमी रीटर्न असे अंतर आहे. 25 जानेवारीपासून ऑनलाइन नोंदणी होईल. 100 किमीसाठी साडेआठ तास तर 50 किमीसाठी साडेतीन तास वेळ असेल. डॉ आंबेडकर मैदानापासून सायकलिंगला प्रारंभ होईल, असे प्रवीण फालक यांनी सांगितले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !