31 मार्चपूर्वी दिलेले टार्गेट पूर्ण करा : प्रांताधिकारी कैलास कडलग
रावेरात महसूल वसुली संदर्भात पार पडली महत्वाची बैठक
रावेर : रावेर तालुक्याला शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व तलाठ्यांनी महसूल वाढीसाठी प्रयत्न करावे व येणार्या 31 मार्चच्या आधी शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे तसेच शेतसारा नजराने बाकी असणार्यांकडून ते भरून घेण्याच्या सूचना प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी दिल्या आहेत. रावेर तहसील कार्यालयात प्रांतधिकारी कैलास कडलक यांच्या प्रमुख उपस्थित महसूल वसूली संदर्भात महत्वाची बैठक पार पडली. यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे उपस्थित होत्या.
सर्व तलाठ्यांनी उदिष्ट पूर्ती करावी
शासनाने रावेर तालुक्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व तलाठ्यांना कामाला लागण्याच्या सूचना यावेळी बैठकीत देण्यात आल्या. रावेर तालुक्याला शासनाकडून दहा कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यावेळी बैठकीला निवासी नायब तहसीलदार सी.जी.पवार तसेच तालुक्यातील सर्व मंडळाधिकारी व सर्व तलाठी उपस्थित होते.



