चाकूच्या धाकावर झालेल्या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती
चाळीसगाव : औरंगाबाद जिल्ह्यातून आईसोबत पाच महिन्यापूर्वी चाळीसगाव येथे फुगे विकण्याच्या व्यवसायासाठी आल्यानंतर सुमारे पाच महिन्यांपूर्वी एका दिवशी (तारीख आठवत नाही) शहरातील दर्गा परीसरात झोपले असताना दोघांनी चाकूचा धाक दाखवत अत्याचार केला शिवाय घटनेची वाच्यता केल्यास आईला ठार मारण्याची धमकी दिल्याने पीडीतेने ही बाब कुणालाही सांगितली नाही मात्र आता पीडीता गर्भवती राहिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडीतेच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निसार सय्यद करीत आहेत.



