श्री राम मंदिर उभारणीसाठी निधी संकलन अभियान जोमात


भुसावळ : अयोध्या येथील श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र निर्माणासाठी निंधी संकलनांतर्गत भुसावळ येथील गणेश सोनार व दमयंती सोनार यांच्यातर्फे रुपये 51 हजारांचा धनादेश देण्यात आला. यावेळी महामंडलेश्‍वर जगन्नाथ हरीजी महाराज, विहिंपचे केंद्रीय मंत्री प्रशांत हरताळकर, देवगिरी सत्संग प्रमुख नारायण घोडके, पूर्णवेळ कार्यकर्ते धोंडू अण्णा माळी आदी उपस्थित होते.

प्रत्येक भारतीयाचा सहभाग आवश्यक
भव्य श्रीराम मंदिर उभारणीसाठी प्रत्येकेना खारीचा वाटा उचलावा, श्रीराम मंदिर उभारणीत सर्व भारतीयांचा सहभाग असणे आवश्यक आहे. हे केवळ मंदिर नसून राष्ट्र मंदिर आहे. भविष्यात देशाची ओळख या मंदिराने व्हावी, मंदिर अद्वितीय असे निर्माण होणार आहे. आपलाही सहभाग प्रत्येक भारतीयांनी नोंदवावा, अशी अपेक्षा प्रशांत हरताळकर यांनी व्यक्त केली.


प्रभू राम वंचितांचे आदर्श : जनार्दन महाराज
जनार्दन हरीजी महाराज म्हणाले की, प्रभू राम हे वंचितांचे आदर्श आहे. एक आदर्श राजा, पती, भाऊ, मित्र कसा असावा याचे मूर्तीमंद उदाहरण राम आहेत. अनेक वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर जन्मभूमीवर मंदिर उभा राहत आहे. हे मंदिर उभारणी लवकरात-लवकर होवून देशांची शान व्हावी, असेही ते म्हणाले. यावेळी अभियानाबद्दल सविस्तर माहिती नारायण घोडके यांनी दिली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !