स्व.सुभाषचंद्र बोस व स्व.बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन


भुसावळ विभागात जयंतीनिमित्त शाळा-महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे : मान्यवरांनी दिली कार्याची महती

भुसावळ : स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेनाप्रमुख हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्ताने भुसावळ शहर व विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ठिकठिकाणी प्रतिमा पूजन करण्यात आल्यानंतर मान्यवरांनी मनोगतात कार्याची माहिती दिली.

सावद्यात स्व.बाळासाहेब ठाकरे जयंती
सावदा ः शहरातील शिवसेना व शिवप्रेमींतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनाप्रमुख हिंदूहदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्ताने प्रतिमा पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना उपतालुकाप्रमुख धनंजय चौधरी, शिवसेना शहरप्रमुख सुरज परदेशी, शहर प्रमुख भरत नेहते, रमाकांत पाटील, निलेश खाचणे, शरद भारंबे, मनीष भंगाळे, गणेश माळी, चेतन माळी, लक्ष्मण पाटील, नितीन सपकाळे, मंगेश माळी, अंकित माळी, आकाश चांदवे, भूषण परदेशी, दीपक भरणे, हेमंत सरोदे, तेजस वंजारी, सम्येक जैन व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व शिवप्रेमी उपस्थित होते.


जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटी
भुसावळ : शहरातील नसरवाजी फाईल सैलानी बाबा दर्गाजवळ अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष सलीम गवळी यांच्या घराजवळ नेताजी बोस व स्व.बाळासाहेब ठाकरे यांंच्या जयंतीनिमित्त जिल्हाध्यक्ष मो.मुन्वर खान, जे.बी.कोटेचा, शहर सचिव हमीद यांनी प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी शहर उपाध्यक्ष इसाक चौधरी, शहर उपाध्यक्ष रमजान मो.खाटीक, हमीदा गवळी, जॉनी गवळी, अकील शाह, शोएब गवळी, यास्मीन कुरैशी, सुमन विलास सावळे, सायरा बानो, शमीम कुरेशी व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

के.नारखेडे विद्यालय
भुसावळ : भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात स्वातंत्र्यवीर सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती शनिवारी सकाळी नऊ वाजता साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक एन.बी.किरंगे यांनी प्रतिमेचे पूजन केले. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक एस.पी.पाठक यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन व कार्याविषयी माहिती दिली. याप्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक रमण भोळे, ज्येष्ठ पर्यवेक्षक वाय.एन.झोपे, पर्यवेक्षक एस.एल.राणे, ज्येष्ठ शिक्षक एस.पी.पाठक व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावल शहर शिवसेना
यावल : शहरात शिवसेनेच्यावतीने सेनेचे संस्थापक हिंदूहृदय सम्राट सरसेनापती स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवसेना शहर व तालुका शिवसेना तसेच युवा सेना, आदिवासी सेना आदींच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलातील शिवसेना कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रसंगी उपजिल्हा संघटक तथा नगरसेवक दीपक बेहेडे, तालुकाप्रमुख रवींद्र सोनवणे, उपप्रमुख शरद कोळी, आदिवासी सेलचे तालुकाप्रमुख हुसेन तडवी, प्रसिध्दी प्रमुख संतोष वाघ, संतोष खर्चे, सुनील बारी, पप्पू जोशी, भरत चौधरी, किरण बारी, हमीद पटेल, गजु भोसले, फारूख पटेल, शकील पटेल, आर.के.चौधरी, सागर बोरसे, योगेश पाटील, मोहसीन शेख, योगेश चौधरी, अजहर खाटीक, ज्ञानेश्वर चौधरी, चंद्रकांत चौधरी, चेतन पाटील, रीशी बेहेडे, कडू पाटील, अनिल पाटील, सांगर देवांग सह मोठ्या संख्येत शिवसैनिक, युवा सैनिकांची उपस्थिती होती.

यावल खरेदी-विक्री संघ
यावल : खरेदी-विक्री संघामध्ये यावल तालुका काँग्रेसच्या वतीने सुभाषचंद्र बोस व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्हा परीषदेचे गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळेस संजय नन्नवरे,हाजी गफार शहा, पत्रकार भरत कोळी, काँग्रेसचे युवा नेते संदीप सोनवणे, सामाजिक कार्यकर्ता सुनील बिरारी, बडोदा येथील चेतन सोनवणे, शिरसाळा येथील आबा सोनवणे, योगेश सोनवणे आदींची उपस्थिती होती.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !