भुसावळ ते खरगपूर रेल्वे कॉरीडॉरची बजेटमध्ये घोषणा


40 ऐवजी केवळ 25 तासात पोहोचणार केळी : कमी खर्चासह दर्जाही टिकणार

भुसावळ : केंद्रीय अर्थसंकल्पात भुसावळ ते पश्चिम बंगालमधील खरगपूरपर्यंत रेल्वे कॉरीडॉरची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील हा पहिलाच कॉरीडॉर असून तो पूर्ण झाल्यास त्याचा खान्देशवासीयांना भविष्यात फायदा आहे. या कॉरीडॉरमुळे महाराष्ट्र व पश्चिम बंगालला जोडणारा महत्त्वाचा दुवा साधला जाईल. भुसावळ विभागातून प्रामुख्याने उत्तर भारतात रेल्वेने केळीची वाहतूक केली जाते. पश्चिम बंगालसह पूर्वेकडील राज्यांमध्ये केळीला मागणी आहे मात्र तेथे ट्रकने केळी पाठवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. भुसावळ ते खरगपूर कॉरिडॉर झाल्यानंतर रेल्वेने 25 तासात (सध्या मालगाडीला 40 तास लागतात) केळी रवाना होईल ऐवढच नव्हे तर कमी खर्चात व दर्जा टिकवून ठेवून तेथे केळी पोहोचवणे शक्य होणार आहे.

पाचोरा- जामनेरचा बोदवडपर्यंत विस्तार
पाचोरा ते जामनेर नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून बोदवडपर्यंत विस्तारीकरण करण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. देशातील नॅरोगेज मार्ग डिसेंबर 2023 पर्यंत ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे.



बजेट 2021 : आरोग्यासाठी 137 टक्के अधिक तरतूद 

बजेट 2021 : सोनं-चांदी आणखी होणार स्वस्त 

बजेट 2021 : नोकरदारांची निराशा ; इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाहीच !


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !