बजेट 2021 : आरोग्यासाठी 137 टक्के अधिक तरतूद
नव दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी कोणत्याही कागदपत्रांशिवाय टॅबच्या सहाय्यानं सादर केलेल्या अर्थसंकल्पात आरोग्य खात्याच्या अर्थसंकल्पात तब्बल 137 टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याचे सांगितले तसेच अर्थसंकल्पात 35 हजार कोटी रुपये कोरोना लसीकरणासाठी देण्यात आले असून गरज भासल्यास आणखी निधी देण्यात येईल, असेही सीतारमण यांनी सांगितलं. यंदा आरोग्य खात्यासाठी तब्बल 2 लाख 32 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर होत आहे. गेल्या वर्षीचा आरोग्य खात्याचा अर्थसंकल्प हा 92 हजार कोटी रुपयांचा होता. म्हणजेच यंदाच्या बजेटमध्ये तब्बल 137 टक्के वाढ झाल्याचे त्या म्हणाल्या.
देशभरात 17 नवीन आरोग्य केंद्र
देशातील 32 विमानतळांवरही आरोग्य केंद्रांची उभारणी होणार असून देशभरात 17 नवीन आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार आहेत तसेच देशात नॅशनल इस्टीट्यूट ऑफ वर्ल्ड हेल्थही सुरु करण्यात येईल. त्यासोबतच, 4 नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी उभारण्यात येणार असून 9 बायोलॅबही सुरू करण्यात येतील. प्रिव्हेंटीव्ह, क्युरेटीव्ह आणि वेल बिईंग पीएम आत्मनिर्भर स्वास्थ योजनेचीही सुरुवात करण्यात येणार आहे, त्यासाठी 62 हजार कोटींची तरतूद केली असून पुढील 6 वर्षात ते खर्च करण्यात येतील, अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली.

