धनंजय मुंडे म्हणाले की, केवळ माझी बदनामी करणे हाच उद्देश !
मुंबई : कॅबीनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध त्यांच्या दुसर्या पत्नीने केल्यानंतर तक्रारीनंतर मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. आरोपांसंदर्भात मुंडे म्हणाले की, करुणा शर्मा यांच्या बाबतीत मी यापूर्वीच खुलासा केला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या विवादात मी स्वतःहून उच्य न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याबाबतीत सदर खुलाशात सविस्तर नमुद केले आहे. मुलांच्या ताब्यावरून तक्रार करणे हेतूबद्दल शंका निर्माण करणारं असल्याचं म्हणत, मुळात जो मुद्दा मेडिएशनमध्ये चचत आहे त्याबद्दल जाहीर मागणी करणे म्हणजे समोरच्या विरोधी पक्षास न्यायीक प्रक्रियेत काहीही रस नसुन निव्वळ मीडिया ट्रायल चालवून बदनामी करणे हाच हेतु दिसून येतो, असेही ते म्हणाले.
मेडिएटर नियुक्ती
दाखल याचिकेत उच्च न्यायालयाने करुणा शर्मा यांना मनाई आदेशही दिला आहे. त्यानंतर विवादावर तोडगा काढण्यासाठी दोघांनी सहमतीने मेडिएटर नेमण्याची विनंती केल्यावरून उच्च न्यायालयाने मद्रास उच्य न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश ताहिलरामानी यांची मेडिएटर म्हणुन नियुक्तीसुद्धा केली आहे. मेडिएशनच्या दोन बैठक झालेल्या असून 13 फेब्रुवारी 2021 रोजी पुढील बैठक निश्चित झालेली आहे. या मेडिएश मध्ये मुलांच्या संदर्भातील सर्व विवादासह इतर सर्व मुद्दे चर्चेत आणि निर्णयार्थ आहेत. ही बाब न्यायप्रविष्ठ असुन न्यायालयीन प्रक्रियेअंती जो निर्णय होईल तो सर्वांवर बंधनकारकच असणार असेही मुुंडे म्हणाले. एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्यातील बाब लक्षात घेऊन सामाजिक जीवनातील व्यक्तीची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंती त्यांनी केली.

