हिंगोणा गावातून 55 वर्षीय महिलेचे अपहरण
यावल (शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2026) : यावल तालुक्यातील हिंगोणा गावातील रहिवाशी 55 वर्षीय महिलेचे अपहरण करण्यात आले. महिलेला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केल्याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले हिंगोणा गावात
हिंगोणा, ता.यावल या गावातील बेघर प्लॉट वस्ती भागातील रहिवाशी सुनीता सुनील इंधाटे (55) या त्यांच्या घरी असताना अज्ञात व्यक्तीने त्यांना कसले तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत त्यांचे अपहरण केले आणि कुठेतरी त्यांना डांबून ठेवले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रारंभी त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र, त्या कुठेच मिळून आल्या नाही म्हणून फैजपूर पोलीस ठाण्यात सुनील आनंदा इंधाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार देवेंद्र पाटील करीत आहे.


