बोदवड शहरात मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात
बोदवड : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरात नुकतीच मिनी मॅरेथॉन स्पर्धा झाली. बोदवड तालुक्यातील मुला-मुलींनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. यावेळी तहसीलदार प्रथमेश घोलप, निरीक्षक राहुल गायकवाड, शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष संदीप मिलांदे, उपाध्यक्ष रामधन माळी, संजय पाटील, निवृत्ती ढोले, सागर पाटील, डॉ.चेतन महाजन, गणेश पाटील, निलेश पाटील, निलेश माळी, दीपक खराटे, सुरज पाटील, प्रमोद धामोडे, आनंदा पाटील यांच्या उपस्थिती होती. सूत्रसंचालन आनंदा वाघ यांनी केले.
17 रोजी बक्षीस वितरण
या स्पर्धेचे प्रमुख शैलेश वराडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. न.ह रांका स्कूलमधील क्रीडा शिक्षक संजय निकम, एन.यु.बागुल, गो.दे.ढाके विद्यालय एणगावचे क्रीडा शिक्षक एस.ए.पाटील यांनी मॅरेथॉन स्पर्धेसाठी सहकार्य केले. स्पर्धेत प्रथम चेतन पद्माकर अलोने (सिंदखेडा, पाली कला वाणिज्य महाविद्यालय, बोदवड), द्वितीय वैभव देविदास मालठाणे, तृतीय उमेश अनार व मुलींच्या गटात प्रथम पायल सुनील सपकाळे (राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय, बोदवड), द्वितीय ममता प्रमोद माळी, तृतीय रिंकू निलेश पाटील यांनी पटकावला. दरम्यान, 17 रोजी शिवजयंतीनिमित्त वकृत्व, कला, निबंध तसेच चित्रकला व क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना पारीतोषिक वितरण जिजाऊ उद्यानात करण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी विविध शाळेतील शिक्षक बंधूंनी सहकार्य केले. आभार क्रीडा शिक्षक संजय निकम यांनी मानले. शैलेश वराडे, दीपक खराटे, गणेश सोनवणे, पवन पाटील, डॉ.शुभम माळी, सुरज पाटील, निलेश ठाकरे यांनी परीश्रम घेतले.


