बोदवडला शिवजयंती उत्सव समितीतर्फे रक्तदान शिबिर 


बोदवड : सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे शहरातील जिजाऊ बालोद्यानात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी 52 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन तहसीलदार प्रथमेश घोलप व पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी केले. रक्तदान केलेल्या दात्यांना समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजारांच्या जीवनावरील पुस्तिका भेट देण्यात आली.

यांची शिबिराला उपस्थिती
या शिबिरासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या रक्तकेंद्राचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ.उमेश कोल्हे, तांत्रिक सहाय्यक लक्ष्मीकांत त्रिपाठी, तंत्रज्ञ रोहिणी देवकर, सुनील अनपट, अधीक्षक परीचर अरुण चौधरी, जनसंपर्क अधिकारी निलेश पवार, परीचारीका संगीता वंजारी, परीचारक प्रभाकर पाटील, चालक सुभाष सोनवणे यांनी रक्तसंकलन काम केले. समिती अध्यक्ष संदीप मिलांदे, उपाध्यक्ष रामधन माळी, प्रमोद धामोडे, सुरज पाटील, शांताराम कोळी, संजय पाटील, निवृत्ती ढोले, गोपाळ पाटील, अनंता वाघ, निलेश ठाकरे व समिती सदस्यांनी परीश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !