भुसावळातील तापीनदी पात्रातून चार टन निर्माल्याचे संकलन
भुसावळातील संस्कृती फाउंडेशनचा सलग पाचव्या वर्षी उपक्रम
भुसावळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम हाती घेतला असून ह्या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी संस्कृती फाउंडेशन च्या माध्यमातून तापी काठावर राहुल नगर व अकलुद शिवारात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. ‘एक दिवस लाडक्या बाप्पासाठी’ या उपक्रमात तापी नदीपात्रातील अविसर्जीत गणेशमूर्ती मुख्य प्रवाहात विसर्जित करण्यात आल्या तर निर्माल्य वगळता सुमारे चार टन प्लास्टिक पिशव्या, केरकचरा, काच, थर्माकोल संकलित करून विल्हेवाट लावण्यात आली.
निर्माल्य संकलनानंतर पुरले
सर्वप्रथम अकलूज शिवारात निर्माल्य संकलित करून वर्गीकरण करण्यात आले निर्माल्य विधिवतपणे खोल खड्डयात टाकण्यात आले. त्यांनतर राहुल नगर शिवारात निर्माल्य संकलन करण्यात आले. सकाळी 7 वाजेपासून ते 12 वाजेपर्यंत सुमारे सहा तास श्रमदान करण्यात आले. विधीवत आरती करून अर्धवट झालेल्या गणेश मूर्तीना वाहत्या प्रवाहात सोडण्यात आले. स्वच्छतेच्या कार्यात जडलेल्या प्रत्येक स्वयंसेवकांना ‘स्वच्छता ही सेवा’ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
यांनी घेतले परीश्रम
संस्थेचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, प्रकल्प प्रमुख अश्फाक तडवी, संस्कार मालविया, अजीत गायकवाड, पवन कोळी, चेतन गायकवाड, हर्षवर्धन बाविस्कर, विशाल पटेल, जितेश टाक, भाग्यश्री बाविस्कर, मानसी खडके, सीमा आढळकर, दीपक पाटील, मंगेश भावे, पवन कांबळे, वैष्णवी कांबळे नम्रता चांडक, हुसेन तडवी, यश चांडक, पराग चौधरी, माधुरी विसपुते, तस्लिम तडवी इत्यादीचा ह्या मोहिमेत सहभाग होता.