कोरोनाचा कहर : नागपूरात 15 ते 21 मार्चदरम्यान लॉकडाऊन !
नागपूर : सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने येत्या 15 मार्चपासून ते 21 मार्चपर्यंत नागपुरात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. या बैठकीनंतर नागपुरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात विनाकारण फिरणार्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात नियमांचे काटेकोरपणे पालन करावं आणि प्रशासनाला नागरीरकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नितीन राऊत यांनी केलं आहे.