राजकीय उलथा-पालथ : भाजपाचे 27 नगरसेवक शिवसेनेत !
जळगाव : जळगाव महानगरपालिकेत सत्तांतर होण्याची दाट शक्यता असून सूत्रांच्या माहितीनुसार सुमारे 27 हून अधिक नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याच माहिती आहे. सत्ताधारी भाजपच्या 57 पैकी तब्बल 27 हून अधिक नगरसेवकांनी मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला असून यामुळे भाजपचे संकटमोचक माजी मंत्री गिरीश महाजन हेच अडचणीत आल्याचे चित्र समोरआले आहे. शिवसेनेकडून सर्व नगरसेवकांना व्हीप बजावण्यात आला असून महापौरपदासाठी सेनेच्या जयश्री महाजन यांच्या नावानेदेखील निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.
महापालिकेतील बलाबल
भाजप – 57
शिवसेना – 15
एमआयएम – 3

