कोरोनाचा कहर : भुसावळात रुग्ण संख्या सहा हजारापार
रविवारी जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 994 रुग्ण आढळले : एकाच दिवसात आठ रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम असून आतापर्यंत तब्बल 1490 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल 994 रुग्ण आढळले असून एकाच दिवसात आठ जणांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 77 हजार 380 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 66 हजार 189 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर रविवारी एकाच दिवसात 719 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, भुसावळात रविवारी तब्बल 222 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून आतापर्यंत सहा हजार 247 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून सातत्याने वाढणार्या रुग्ण संख्येमुळे चिंता व्यक्त होत आहे. बाधीतांपैकी पाच हजार 20 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 219 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे तर एक हजार 8 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
रविवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 250
जळगाव ग्रामीण 57
भुसावळ 222
अमळनेर 11
चोपडा 160
पाचोरा 15
भडगाव 62
धरणगाव 66
यावल 32
एरंडोल 01
जामनेर 19
रावेर 00
पारोळा 51
चाळीसगाव 45
मुक्ताईनगर 00
बोदवड 03
अन्य जिल्हा 00




