वादळाने नुकसान, पंचनाम्यासह भरपाई द्या : रावेरात भाजपाचे निवेदन
रावेर : रावेर परीसरात 21 रोजी वादळी अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकर्यांवर मोठे संकट कोसळले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपातर्फे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना निवेदन देवून करण्यात आली. भाजपातर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रावेर तालुक्यात 20 व 21 रोजी वादळ व अवकाळी पावसामुळे हरभरा, गहू व मका अश्या विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे तत्काळ पंचनामे करावेत व शेतकर्यांना भरपाई द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, भाजपा शहराध्यक्ष दिलीप पाटील, परमेश्वर सोनार, संदीप सावळे, अजिंक्य वाणी, गणेश मराठे, लक्ष्मण पाटील, महेंद्र पाटील, सुधाकर पारधी, विनायक महाजन आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.





