कोरोनाचा प्रादुर्भाव : खडक्यात जि.प.सदस्य रवींद्र पाटील यांनी घेतली बैठक


भुसावळ : तालुक्यातील खडका येथे कोरोना रुग्णांची सातत्याने संख्या वाढत असल्याने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जि.प.सदस्य रवींद्र पाटील यांनी आरोग्य विभागाची बैठक घेवून सूचना केल्या. वेळीच रुग्णांना कोरोनाची चाचणी केल्यास तातडीने उपचार करणे शक्य होणार असून कोरोनाचा प्रादुर्भाव देखील वाढणार नाही, असे जि.प.सदस्य पाटील म्हणाले तसेच जिल्हा परीषद शाळेत कॉरंटाईन सेंटर सुरू करण्याच्या प्रशासनाला त्यांनी सूचना केल्या.

यांची बैठकीला उपस्थिती
दाखल असलेल्या रुग्णांना योग्य तो औषध साठा उपलब्ध करून द्यावा तसेच ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील यांनी केली. बैठकीला सर्व आरोग्य सेवक व सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच पंचायत समिती उपसभापती प्रीती पाटील, तालुका गटविकास अधिकारी विलास भाटकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संगीता दवंगे, गटशिक्षण अधिकारी तुषार प्रधान, माजी उपसभापती गोलु पाटील, रईस खान लोधी, चुडामण भोळे, भैय्या महाजन, अनिस खान लोधी, किरण भोळे, मोहन भिरुड, सागर पाटील, अनिल महाजन, डॉ.कल्पना दवंगे, डॉ.राहुल राजपूत, भिरुड आदींची उपस्थिती होती.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !