वादळी पाऊस : रावेर तालुक्यात 468 शेतकर्यांचे सात कोटींचे नुकसान
रावेर : गत आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे सुमारे तालुक्यताल 468 शेतकर्यांचे सुमारे सात कोटींचे नुकसान झाले असून प्रशासनाला अंतिम अहवाल प्राप्त झाला आहे. रावेर तालुक्यात मागील आठवड्यात 20 व 21 रोजी झालेल्या वादळी पावसाचा अंतिम अहवाल प्राप्त झाला आहे. पंचनामे करण्यात ढिलाईपणा करण्यार्या महसूलला भाजपाने निवेदन देताच मंगळवारी अखेर अंतिम पंचनाम्यांचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये 31 गावांमधील 468 शेतकर्यांचे 303 बाधीत क्षेत्रावरील सहा कोटी 97 लाख 43 हजार रुपये नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये 205 शेतकर्यांचे 145 मक्याचे क्षेत्र नुकसानीमुळे बाधीत झाले आहे. गव्हासह केळीला या वादळी पावसाने मोठा फटका बसला आहे.





