नांदेड़ आणि हजरत निजामुद्दीन दरम्यान उत्सव विशेष ट्रेन धावणार


भुसावळ : रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी नांदेड ते हजरत निजामुद्दीन दरम्यान उत्सव विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हजरत निजामुद्दीन-नांदेड विशेष एक्स्प्रेस
डाऊन 04038 उत्सव विशेष हजरत निजामुद्दीन-नांदेड विशेष एक्स्प्रेस 25 मार्च व 1 एप्रिल रोजी 11.15 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी 9.40 वाजता नांदेडला पोहोचणार आहे. अप 04037 नांदेड-हजरत निजामुद्दीन विशेष गाडी 27 मार्च व 3 मार्च रोजी 11.05 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी 10.10 वाजता हजरत निजामुद्दीनला पोहोचेल. या गाडीला पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, खंडवा,इ टारसी, हबीबगंज, भोपाल, बीना, झांसी, ग्वालियर, आग्रा कान्ट, मथुरा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला दोन एसी टू टीयर, सहा एसी थ्री टीयर, सहा स्लीपर क्लास और चार सेकंड क्लास सीटींग बोगी जोडण्यात येतील. केवळ आरक्षीत तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !