कोरोनाचा कहर : जिल्ह्यात 15 दिवस कठोर निर्बंध लादावेत
भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नि.तु.पाटील यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
भुसावळ : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची सातत्याने वाढणारी रुग्ण संख्या पाहता जिल्ह्यात सलग 15 दिवस (24 तास) कठोर निर्बंधयुक्त संचारबंदी जाहीर करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नि.तु.पाटील यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. आगामी काळात रुग्णांची संख्या वाढल्यास अपुर्या मनुष्यबळामुळ आपल्याला साथीचा अटकाव करता येणार नाही, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
असे सूचवले निर्बंध
दवाखाने/मेडिकल खाजगी सकाळी 10 ते 4 फक्त (आपत्कालीन सेवा 24 तास सुरू)
दूध डेअरी सकाळी 6 ते 10 संध्याकाळी 6 ते 8 फक्त
किराणा दुकान सकाळी 10 ते 4 फक्त
भाजीपाला गल्लोगल्ली सकाळी 7 ते 11 फक्त
बँक सकाळी 10 ते 4 फक्त
रेशन दुकान सकाळी 10 ते 4 फक्त




