कोरोना सुसाट ! 13 रुग्णांचा मृत्यू : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 1183 रुग्ण आढळले
जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 81 हजार 969 वर : एकाच दिवसात 995 रुग्णांची कोरोनावर मात : 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात गुरूवारी कोरोनाचे तब्बल 1183 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1539 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 81 हजार 969 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 69 हजार 976 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर गुरुवारी एकाच दिवसात 995 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
गुरूवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 274
जळगाव ग्रामीण 12
भुसावळ 143
अमळनेर 88
चोपडा 195
पाचोरा 15
भडगाव 10
धरणगाव 69
यावल 32
एरंडोल 122
जामनेर 41
रावेर 36
पारोळा 48
चाळीसगाव 28
मुक्ताईनगर 47
बोदवड 21
अन्य जिल्हा 02




24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासात जळगाव शहरातील 70 वर्षीय पुरुष व 35 व 50 वर्षीय महिलेचा, रावेर तालुक्यातील 54, 78, 80 वर्षीय पुरुषाचा, यावल तालुक्यातील 55 वर्षीय पुरूषाचा व 65 वर्षीय महिलेचा तसेच जळगांव तालुक्यातील 61 वर्षीय महिलेचा, भुसावळ तालुक्यातील 53 वर्षीय महिलेचा व चोपडा तालुक्यातील 42 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला व बोदवड तालुक्यातील 55 वर्षीय पुरुषाचा व धरणगाव तालुक्यातील 48 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

