रावेर तालुक्यात चना-हरभरा खरेदीचा शुभारंभ
रावेर : तालुक्यात नाफेडमार्फत आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हमी भावाने (चना/हरभरा) 2020/2021 वर्षाच्या हंगामात, उपअभिकर्ता संस्था म्हणून तालुक्यातील श्रमसाधना फार्मस पोडुसर कंपनी मार्फत हरभरा खरेदीचा शुभारंभ गुरुवार, 25 मार्च 2021 रोजी चोरवड येथे रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. सावदा नगरीचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांच्या हस्ते काटा पूजन व धान्य पूजन करण्यात आले. प्रथम आलेले शेतकरी रवींद्र देवराम पाटील (मोरगाव) यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्रमसाधना फार्मस पोडुसर कंपनीचे चेअरमन रमेश नगराज पाटील, पं.स.सदस्य दीपक पाटील, शेख हमीद, संतोष पाटील, जी.व्ही.पाटील, राहुल महाजन, सचिन पाटील, किरण पाटील, ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते.





