अरे देवा ! : जळगाव जिल्ह्यात 1196 कोरोना रुग्ण आढळले


जिल्ह्यातील बाधीतांचा आकडा 83 हजार 165 वर : आतापर्यंत 70 हजार 877 रुग्णांची कोरोनावर मात तर 24 तासात 15 रुग्णांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे तब्बल 1196 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 83 हजार 165 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 70 हजार 877 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत एक हजार 554 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, शुक्रवारी एकाच दिवशी 901 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात तब्बल 15 रुग्णांचा मृत्यू ओढवला.

शुक्रवारी आढळलेले कोरोनाबाधीत असे
जळगाव शहर 242
जळगाव ग्रामीण 05
भुसावळ 99
अमळनेर 95
चोपडा 362
पाचोरा 30
भडगाव 09
धरणगाव 67
यावल 35
एरंडोल 28
जामनेर 84
रावेर 28
पारोळा 25
चाळीसगाव 40
मुक्ताईनगर 01
बोदवड 26
अन्य जिल्हा 10





24 तासात 15 रुग्णांचा मृत्यू

मृतांमध्ये जळगाव शहरातील 36, 48, 50, 60, 63 वर्षीय पुरूष व 49 व 59 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

भुसावळ तालुक्यातील 56 व 59 वर्षीय पुरूष

जामनेर तालुक्यातील 75 वर्षीय पुरूष व 65 वर्षीय महिला

रावेर तालुक्यातील 54 वर्षीय पुरूष

यावल तालुक्यातील 75 वर्षीय महिला

अमळनेर तालुक्यातील 70 वर्षीय पुरूष

चोपडा तालुक्यातील 62 वर्षीय महिला



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !