रावेरकरांचा बंदला प्रतिसाद : विना मास्क फिरणार्‍यांवर कारवाई


रावेर : रावेर शहरासह परीसरात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे लावलेल्या तीन दिवसांच्या लॉकडाऊनला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील अनेक रस्ते सामसूम दिसून आले तर व्यापार्‍यांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली तसेच विना मास्क बाहेर फिरणार्‍यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.

रस्त्यांवर शुकशुकाट
रविवारी जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे नेहमी वर्दळ असणार्‍या रावेर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, मेन रोड, गांधी चौक, चावडी भाग, पंचशील नगर आदी ठिकाणी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. मास्क न लावता व विनाकारण बाहेर फिरणार्‍यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. स्टेशन रोड, स्वतीक टॉकीज, उटखेडा रोडवर पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी करण्यातआली तसेच रावेर परीसरातील केर्‍हाळा, रसलपूर, वाघोड, वाघोदा, खानापूर आदी गावांमध्ये देखील लॉकडाऊनला प्रतिसाद लाभला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !