भुसावळातील सिंधी कॉलनीत रस्ता काँक्रिटीकरणाचा शुभारंभ


भुसावळ : भाजपा आमदार संजय सावकारे व लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या नेतृत्वात शहरातील सिंधी कॉलनी भागात आहुजा किराणा ते शनी मंदिरा परीसरात रस्ता काँक्रिटकरण कामाचा शुभारंभ उपनगराध्यक्ष रमेश नागराणी यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. निवडणुकीवेळी जनतेला दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्याचा मानस असून आम्ही जनते ला दिलेल्या प्रत्येक शब्दावर व विश्वासावर खरा उतरणार असल्याची हमी प्रसंगी मान्यवरांनी दिली. यावेळी ज्ञानचंद लेखवाणी, रमेश आठवाणी, अजय नागराणी, माजी नगरसेवक निक्की बतरा, दिनेश छाबडिया, राहुल माखीजा व प्रभातील इतर सर्व नागरीक उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !