मुक्ताईनगरात एमआयडीसी हद्द ठरवण्याबाबत आमदारांची अधिकार्यांसोबत बैठक
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर व बोदवड तालुक्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या सारोळा-माळेगाव शिवारातील प्रस्तावीत औद्योगिक वसाहत होण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आग्रही मागणीनंतर प्रस्तावास मंजुरी मिळण्याकामी शासन स्तरावर कामकाज सुरू आहे. सहा महिन्यात महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच औद्योगिक वसाहत मंडळाचे वरीष्ठ अधिकार्यांनी भेट देवून जागेची पाहणी केली. बुधवार, 24 मार्च 2021 रोजी महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वरीष्ठ भूमापक अधिकार्यांनी निश्चिती व हद्द ठरविण्य बाबत सीमांकनासाठी आले होते. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी अधिकार्यांसमवेत हद्द ठरविण्याबाबत महत्वपूर्ण सखोल चर्चा केली.
यांची होती उपस्त्तिी
प्रसंगी प्रमुख भूमापक सुधीर उगले, भूमापक ठाकरे, चौरे, निमखेडी खुर्द व सारोळा तलाठी यांच्यासह राजेंद्र कांडेलकर, स्वीय सहा.प्रवीण चौधरी तसेच औद्योगिक वसाहत मंडळाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

