कोरोनाचा कहर कायम : जळगाव जिल्ह्यात 1205 रुग्ण आढळले : 14 रुग्णांचा मृत्यू


जिल्ह्यातील बाधीतांचा आकडा 86 हजार 688 वर : आतापर्यंत 73 हजार 665 रुग्णांची कोरोनावर मात तर 24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे तब्बल 1205 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 86 हजार 688 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 73 हजार 665 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत एक हजार 597 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, सोमवारी एकाच दिवशी 920 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात तब्बल 14 रुग्णांचा मृत्यू ओढवला.

सोमवारी आढळलेले कोरोनाबाधीत असे
जळगाव शहर 280
जळगाव ग्रामीण 50
भुसावळ 36
अमळनेर 93
चोपडा 392
पाचोरा 33
भडगाव 63
धरणगाव 29
यावल 26
एरंडोल 20
जामनेर 61
रावेर 37
पारोळा 10
चाळीसगाव 26
मुक्ताईनगर 30
बोदवड 16
अन्य जिल्हा 03





24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू

मृतांमध्ये जळगाव शहरातील 52, 60 व 88 वर्षीय पुरूषाचा

भुसावळ तालुक्यातील 65, 69 व 71 वर्षीय पुरूषाचा

धरणगाव तालुक्यातील 40 व 43 वर्षीय पुरूषाचा

जळगाव तालुक्यातील 40 वर्षीय पुरूषाचा व 65 वर्षीय महिलेचा

चोपडा तालुक्यातील 75 वर्षीय पुरूष व 60 वर्षीय महिलेचा

अमळनेर तालुक्यातील 75 वर्षीय पुरूषाचा व 74 वर्षीय महिलेचा समावेश आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !