खाजगी दुकानदारांना कर्मचार्यांच्या कोरोना लसीकरणासह कोविड चाचणी निगेटीव्हचा अहवाल बंधनकारक
भुसावळात मुख्यधिकार्यांनी दुकानदारांना बजावल्या नोटीसा : तर कारवाई
भुसावळ : खाजगी दुकानदारांना कर्मचार्यांच्या कोरोना लसीकरणासह कोविड चाचणी निगेटीव्हचा अहवाल बंधनकारक जिल्ह्यात सातत्याने वाढणार्या कोरोनो रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा देणारे दुकाने, सार्वजनिक वाहतूक करणारी कार्यालये, हॉटेल्स तसेच सर्व आस्थापनांमध्ये काम करणार्या कामगार, कर्मचारी, मालक, चालक, होम डिलीव्हरी बॉय यांचे (सद्यस्थितीत 45 वर्ष) यांचे कोविड लसीकरण अत्यावश्यक असून तसेच ज्यांचे लसीकरण लसीकरण झालेले नाही त्यांनी 10 एप्रिलपासून कोविड आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटीव्ह ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. (हा चाचणी अहवाल येत नाही तोपर्यंत रीपोर्ट बाळगणे आवश्यक आहे) तसे नसल्यास पालिकेच्या पथकाकडून कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी गुरुवार, 7 रोजी व्यावसायीकांना बजावलेल्या नोटीसीद्वारे दिला आहे. खाजगी दुकानदारांना कर्मचार्यांच्या कोरोना लसीकरणासह कोविड चाचणी निगेटीव्हचा अहवाल बंधनकारकदुकानदारांनी आपल्या दुकानात किंवा सेवा पुरवठा करणार्या संस्थेत कोविड आरटीपीसीआर केल्याची चाचणी करणे अनिवार्य असून या प्रमाणपत्राची मुदत 15 दिवस असणार आहे. भुसावळ पालिकेच्या पथकाने ही तपासणी करताना प्रमाणपत्र नसल्याचे आढळल्यानंतर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईली, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या आदेशामुळे व्यापार्यांची मात्र मोठे डोकेदुखी वाढली आहे.




