रुग्णांना जगण्याचा आत्मविश्वास द्या, भावपूर्ण श्रद्धांजलीचे संदेश थांबवा*
जागर प्रतिष्ठानचे जनहितार्थ आवाहन : मृत विधी दहाव व सोळावं तीन दिवसात उरकण्याचे आवाहन
भुसावळ : जागर प्रतिष्ठानचा मॅसेज सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. मेसेज मध्ये रुग्णांचा आत्मविश्वास वाढविण्याबाबत आवाहन केले आहे. तसेच आपल्या जवळील व्हॉट्स अॅप व फेसबुकचा समकरात्मक वापर करण्याचे आवाहन केले आहे. जागर प्रतिष्ठानच्या व्हायरल मेसेज मध्ये म्हटले आहे की, ह्निंसकारात्मक वातावरण तयार करूया, रुग्णांचा आत्मविश्वास वाढवूया.



भावपूर्ण श्रद्धांजली जरा थांबवाच
मित्रांनो कोरोनाचा हाहाःकार सुरू आहे. अनेक नातलग आणि मित्र परीवार मृत्युमुखी पडत आहेत. घडल्या घटनेनंतर आपण दुःख व्यक्त करण्यासाठी स्टेटस, पोस्ट, बॅनर, फेसबुक, व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करतोय. या पोस्टमुळे एक नकारात्मक वातावरण निर्माण होऊ लागले आहे. रुग्णालयात दाखल रुग्णाजवळ आज एकमेव करमणूक करण्याचे साधन असते ते म्हणजे मोबाईल आणि त्यातून त्याला बाहेर घडणार्या सार्या वाईट घटना त्याच्या समोर येतात. आणि नकारात्मक विचार व भूमिका त्याची होत असते. त्यातच सर्वच मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजली चे संदेश सध्या अधिक दिसू लागले आहेत. हे पाहून रुग्णाचा एकवटलेला आत्मविश्वास पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतो आहे. यातून शरीरात असलेला कोरोना डोक्यात घट्ट विळखा धरतो. सोबतच अनेक रुग्ण हे केवळ *कोरोना झाला माझे व माझ्या परिवाराचे काय होईल या भीतीनेच दगावत आहेत.* काहींना भीती मुळे हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. तेव्हा आपल्याला हे सारं थांबवावे लागणार आहे. आपल्या भावना आपण जर मनोमन किंवा वैकतिकरित्या व्यक्त केल्या तर नक्कीच रुग्णालयात दाखल कोरोना रुग्णापर्यंत आपण थोडे का होईना सकारात्मक वातावरण बनवू शकतो. परीरणामी हळू हळू का होईना त्याच्यामध्ये जगण्याचा आत्मविश्वास जागा होणार आहे. पुन्हा तो आपल्या सोबत असणार आहे. तेव्हा थोडी स्वयंशिस्त बाळगूया बी पॉझिटिव वातावरण तयार करूया, असे आवाहन करण्यात आले आहे तसेच महामारी काळात खेड्या-पाड्यात लग्न सोहळे प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. तेव्हा लग्न समारंभ देखील पुढे ढकलण्याचे व अन्य कारणे मृत्यू झाल्यास मृतात्म्याचे 16 किंवा 11 दिवस पार पडणारे विधी 3 किंवा 5 दिवसात पार पाडण्याचे आवाहन अध्यक्ष प्रा.पंकज पाटील, उपाध्यक्ष श्रीराम सपकाळे, कोषाध्यक्ष हृषिकेश पवार, सचिव प्रा निलेश गुरूचळ, सहसचिव एडवोकेट हरेश पाटील, संचालक गोकुळ सोनवणे, पवन पाटील यांनी केले आहे.

