मुंबई-हटिया व पुणे-दानापूर गाडी धावणार


भुसावळ : मुंबई-हटिया व पुणे-दानापूर विशेष गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 01127 विशेष द्वि-साप्ताहिक गाडी 13 ते 30 एप्रिलदरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवार आणि शुक्रवारी 11.05 वाजता सुटेल आणि हटिया येथे तिसर्‍या दिवशी 3.45 वाजता पोहोचणार आहे. 01128 द्वि-साप्ताहिक विशेष गाडी 15 ते 2 मे दरम्यान पर्यंत प्रत्येक गुरुवार आणि रविवारी हटिया येथून 8.40 सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी 1.30 वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ जंक्शन, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगड, झारसुगुडा, राउरकेला स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला दोन तृतीय वातानुकूलित, पाच शयनयान, 14 द्वितीय आसन श्रेणी बोगी जोडण्यात येणार आहे. दरम्यान, पुणे-दानापूर विशेष गाडी 01439 अतिजलद विशेष गाडी 13 व 20 एप्रिल व 27 एप्रिल रोजी पुणे येथून 6.10 वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसर्‍या दिवशी 11.40 वाजता पोहोचेल. 01440 विशेष गाडी 14 व 21 व 28 एप्रिल दानापूर येथून 13.40 वाजता सुटेल आणि पुण्याला दुसर्‍य दिवशी 11.10 वाजता पोहोचेल. या गाडीला दौंड कॉर्डलाईन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी आणि पं.दीनदयाल उपाध्याय जंक्शन स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला दोन तृतीय वातानुकूलित, नऊ शयनयान, नऊ द्वितीय आसन श्रेणी बोगी जोडण्यात येणार आहे. केवळ कंन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !