रेल्वे प्रवाशांनी प्रवासापूर्वी नव्वद मिनिटे आधी स्थानकावर उपलब्ध रहावे


रेल्वे प्रशासनाचे आवाहन : गर्दी टाळण्याच्या सूचना

भुसावळ : कोविड- 19 च्या अनुषंगाने रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी अतिरीक्त गर्दी टाळावी तसेच गाडी सुटण्याच्या 90 मिनिटे आधी रेल्व स्थानकानकावर याव तसेच अतिरिक्त सेवांच्या विशेष कारणांबद्दल आणि बुकिंगच्या संदर्भात पॅनिक बुकींग असा तर्क काढणे टाळावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. कोविड19 चा संसर्ग थांबविण्यासाठी फक्त कंफर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच ट्रेनमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात आली असून प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !