वरणगावात बसेस न थांबत असल्याने प्रवाशांची गैरसोय : राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा


भुसावळात एस.टी.महामंडळास निवेदन : अधिकार्‍यांची दखल घेण्याची ग्वाही

वरणगाव : महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाल्याने बसेस वरणगाव शहरात बसेस न येता सरळ महामार्गाने जात आहेत परीरणामी प्रवासी त्रस्त झाले आहेत व परीसरातील खेड्यातील लोकांचेही ये जा करणे त्रासदायक ठरू लागले आहे. त्यामुळे पूर्वी ज्या बसेस वरणगावमार्गे जात होत्या त्या सर्व याच मार्गे जाऊन महार्गावरील सर्व बसेस वरणगांव येथे थांबवाव्यात अन्यथा सर्व सामान्य लोकांना होणार्‍या त्रासाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व होणार्‍या परीणामास आपण जबाबदार रहाल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस तालुका भुसावळच्या वतीने लेखी निवेदन सादर करून आगारप्रमुख प्रमोद चौधरी यांना देण्यात आला.

निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष दीपक मराठे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. जिल्हा बस नियंत्रक दिलीप बंजारा, जळगांव याच्याशी पण दुरध्वनीवर संपर्क साधून कैफीयत मांडण्यात आली तसेच वरणगाव बस स्थानकावर बसेस न थांबल्यास तीव्र स्वरूपाचे अांदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. संबंधित अधिकार्‍यांनी बसेस थांबण्याबाबत आश्‍वासन दिले. यावेळी भुसावळ तालुकाध्यक्ष दीपक मराठे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष पप्पू जकातदार, वरणगाव शहर उपाध्यक्ष कैलास माळी, युवक तालुका कार्याध्यक्ष विनायक शिरनामे, अहसान अहमद, इफ्तेखार मिर्झा, ओबीसी सेल वरणगांव शहराध्यक्ष हिमालय भंगाळे आदी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !