भुसावळात तीन भामट्यांनी धूम स्टाईल मोबाईल


भुसावळ : जळगाव रोडवरील चितोडे वाणी समाज मंगल कार्यालयाजवळून कामाच्या साईटवरून पायी येत असतांना तीन भामट्यांनी अडवित चौकशी करून एकाच्या खिश्यातील पाच हजार रुपये किंमतीचा मोबाइॅल हिसकावून घेतल्याची घटना गुरूवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. शहरातील महेश नगरातील रहिवासी बाल्या राजपूत हे चितोडे वाणी मंगल कार्यालयाजवळून वीटभट्टी मैदानाजवळील महादेवाच्या मंदिराजवळून येत असतांना गुरूवारी सायंकाळी सातच्या सुमारास तीन युवक आले व त्यांनी कोठून आले, कोठे जात आहे, कोठे राहतो याची चौकशी करीत राजपूत यांच्या खिश्यातील पाच हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरीने हिसकावून घेतला. याप्रकरणी राजपूत यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तीन अनोळखी व्यक्ती विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दत्तात्रेय कोळी पुढील तपास करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !