25 लाखांचे खंडणी प्रकरण : त्या तरुणीच्या आईला सुनावली कोठडी
लासलगाव : जामनेर येथील ललवाणी कुटुंबीयांकडून सुमारे 25 लाख रुपयांची खंडणी मागणार्या श्रीरामपूर येथील महिलेला 50 हजारांची खंडणी स्वीकारताना अटक करण्यात आली होती. निफाड न्यायालयाने सुरूवातीला आरोपी महिलेला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली तर कोठडी संपल्याने पुन्हा निफाड न्यायालयात हजर केले असता पुन्हा तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.
25 लाखांची खंडणी मागताना महिलेला अटक
ललवाणी कुटुंबीयांकडून एका गुन्ह्यातील वाद मिटवण्यासाठी श्रीरामपूर येथील महिलेने सुमारे 25 लाख रुपयांची मागणी केली होती व ती रक्कम बुधवारी लासलगाव येथील एका लॉजवर स्वीकारताना लासलगाव पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले होते. यासंदर्भात लासलगाव पोलिसात गुन्हा दाखल आहे. गुरुवारी या संशयित महिलेला एक दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने दिली होती. त्यानंतर पुन्हा या महिलेला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. या गुन्ह्यात जामनेर येथील प्रफुल्ला लोढा व सुनील कोचर यांनाही सहआरोपी करण्यात आले. लासलगावचे सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.






लाच मागताच दाखल केली तक्रार
श्रीरामपूर येथील एका तरुणीने आपल्या इच्छेविरुद्ध विवाह झाल्याने तसेच विनयभंग करण्यात आल्याने श्रीरामपूर पोलिसात तक्रार दिली होती. या प्रकरणी 2 मार्च 2021 रोजी तरुणीचा पती ऋषभ ललवाणी, चुलत सासरे व माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी, चंदूलाल ललवाणी, सासरे विकास ललवाणी, सासूर भावना ललवाणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तो शून्य क्रमांकाने जामनेर पोलिसात वर्ग करण्यात आला होता. दरत्यान, या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व गुन्हा मागे घेण्यासाठी पीडीत तरुणीची आई ज्योती चंदूलाल कोठारी महिलेने ललवाणी कुटुंबियांकडून मागितली होती. ही रक्कम ही नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव येथील ऐश्वर्या लॉज या ठिकाणी द्यावे, असे ज्योती कोठारी यांनी सांगितले होते तर अल्केश झुंबरलाल ललवाणी यांनी लासलगाव पोलीस कार्यालयात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. खंडणीची रक्कम स्वीकारताच पोलिसांनी जप्त रकमेच्या नोटांचे क्रमांक नोंदवले तर प्रफुल्ल लोढा व सुनील कोचर यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आल्याने त्यांना सहआरोपी करण्यात आले. तपास सहा.निरीक्षक राहुल वाघ करीत आहेत.