जिल्ह्यात आमदारांच्या पाठपुराव्यातून ऑक्सीजन प्रकल्प उभा राहिल्याची बाब आनंददायक
पालकमंत्री गुलाबराव पाटील : भुसावळातील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन प्रणालीचे उद्घाटन : पालकमंत्री उवाच ः तिसर्या लाटेसाठीही आम्ही सज्ज
भुसावळ : जिल्ह्यासह महाराष्ट्रात ऑक्सीजन तुटवडा भासत असल्याची बाब समोर असतानाच पहिलाच ऑक्सीजन प्लाँट माझ्या जळगाव जिल्ह्यात आमदारांच्या निधीतून उभा राहत असल्याची बाब निश्चितच आनंददायी आहे. शिवाय भुसावळसाठी भविष्यात एक कोटी नऊ लाख रुपयांचे इस्टीमेट तयार असून तेही गरज पडल्यास मंजूर करण्यात येईल, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील येथे म्हणाले. शनिवारी सायंकाळी पाच वाजता ट्रामा केअर सेंटर आणि ग्रामीण रुग्णालय हॉस्पिटलच्या आवारात प्रकल्पाचे औपचारीक उद्घाटन झाल्यानंतर ते बोलत होते.
तिसर्या लाटेसाठीही सज्ज : पालकमंत्री
पालकमंत्री गुलाबराव म्हणले की, ऑक्सीजन प्लाँट सुरू झाल्याने मोठा दिलासा भुसावळकरांना मिळाला आहे शिवाय लवकरच ग्रामीण रुग्णालयातील अपूर्ण सुविधा लवकरच पूर्ण करण्यात येतील. जिल्ह्यातील मुक्ताईनगर, जामनेर, चाळीसगाव, चोपडा, मोहाडी, जळगाव, धरणगाव, पारोळासह दहा ठिकाणी अशाच पद्धत्तीने प्लाँट उभे राहतील त्यासाठी दहा कोटींचा निधी डीपीडीसीतून देण्यात आला आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, तिसर्या लाटसाठी आम्ही सज्ज असल्याचेही ते म्हणाले.

आमदारांच्या सूचना पूर्ण करण्याची जवाबदारी आमचीच
पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील रुग्णांलयामध्ये पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यात आला असून ग्रामीण रुग्णालयातील विद्युत प्रश्नासाठी 48 लाख रुपये आमदारांच्या सूचनेवरून मंजूर करण्यात आले तसेच आमदार संजय सावकारे व भुसावळ नगरपालिकेतर्फे ज्या सूचना येतील त्या पूर्ण करण्याची जवाबदारी आमची असेल, असेही गुलाबराव म्हणाले.
शहर व तालुक्यातील रुग्णांना दिलासा : आमदार सावकारे
माजी पालकमंत्री व आमदार संजय सावकारे म्हणाले की, महाराष्ट्रात ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेला हा पहिलाच डीपीडीसीतील निधीतला प्रकल्प आहे. कोविडच्या पहिल्या लाटेत लक्षात आले होते की, ऑक्सीजन मोठ्या प्रमाणात लागतो व वारंवार ऑक्सीजन सिलिंडर भरण्यासाठी पाठवावे लागण्याची बाबही खर्चिक आहे मात्र आता रुग्णालयातील शंभर बेडसाठी एकाचवेळी ऑक्सीजनची सुविधा पुरवता येणे शक्य झाल्याने शहर तालुक्यातील रुग्णांनाही येथे दिलासा मिळणार आहे.
यांची होती उपस्थिती
जिल्हा शल्य चिकित्सक नागोजीराव चव्हाण, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, तहसीलदार दीपक धीवरे, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौघे, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, नगरसेवक मनोज बियाणी, शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, युवराज लोणारी, रवी सपकाळे, निक्की बत्रा, सतीश सपकाळे, शिवसेना शहराध्यक्ष बबलू बर्हाटे, राजीव पारीख, पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक विश्वनाथ पाटील व पोलिस कर्मचारी तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयूर चौधरी, डॉ.नितु.पाटील, डॉ.चाकूरकर डॉ.विक्रांत सोनार व कंत्राटदार अजीतसिंग बेहरा आदी उपस्थित होते.
एका मिनिटात अडीचशे लिटर ऑक्सिजन निर्मिती
ट्रामा केअर सेंटरमधील प्रकल्पातून एका मिनिटात अडीचशे लिटर ऑक्सिजनची निर्मिती होईल. हवेमधून ऑक्सिजन घेऊन हा थेट मशनरीच्या माध्यमातून रुग्णांना मिळेल. या प्रकल्पामुळे आता बाहेरून ऑक्सिजन सिलिंडर घेण्याचा खर्चदेखील वाचणार आहे त्यामुळे शासनाच्या पैशांची बचतदेखील होणार आहे.

